विनायक मेटेंनी ‘लक्ष’वेधताच शासनाची घोषणा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड नगर पालिकेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणित विनायक मेटेंनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. यानंतर शासनाने मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे सह सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.
कर्तव्यात कसूर करणे, नगरपालिकेतील अनियमतितेचा ठपका ठेवून मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, जिल्हा प्रशासन अधिकारी नीता अंधारे, पाणी पुरवठा अभियंता राहुल टाकळे, बांधकाम अभियंता योगेश हाडे, कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ रचना सहायक सलीम याकूब या सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही कारण्यात आली आहे.
व्हिडिओ पहा : Source Twitter
बीड नगरपालिकेत सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये गैरव्यवहार होते असल्याचे माननीय सदस्य श्री. @vinayakmete, श्री. @MahadevJankarR, श्री. @shindespeaks, विरोधी पक्षनेते @mipravindarekar, श्री. संजय दौंड यांनी लक्षवेधीद्वारे मांडले. @NCPspeakshttps://t.co/8kZLkRBW6F
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) March 21, 2022
बीड नगर पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे शहरवासीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. या संदर्भात अनेक वेळा आवाज उठवून सुद्धा पालिकेच्या कामकाजात सुधारणा होत नव्हती. आमदार विनायक मेटे यांनी अखेर अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातुन समोर आणला होता.
या लक्षवेधी सूचनेवर चर्चा झाली. या चर्चेत शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण व इतर सदस्यांनी सहभाग घेतला. नगरपालिका अंतर्गत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यात कसूर करतात, तसेच लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या बैठकांना हजर राहत नाहित असा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला होता. यावर राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली.
चौकशी समिती पुनर्गठित होणार
दरम्यान, नगरपालिका अंतर्गत गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती पुनर्गठित करण्यात येईल अशी घोषणा देखील नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.