By MahaTimes ऑनलाइन – बीड |
माजलगाव-तेलगाव मार्गावरील शिंदेवाडी फाट्यावर शनिवारी सकाळी एक भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या कारच्या धडकेत दो जण भीषण अपघातात मोटारसायकिलवरील लक्ष्मण भीमराव विघ्ने (60) व सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव (35) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, मयत शिंदेवाडी येथील रहिवासी आहेत.
प्राप्त माहिती अशी की, माजलगावकडून तेलगावकडे जाणारी कार (एम.एच. 44 एस 3203) च्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने समोरून (शिंदेवाडीकडून) येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक बसली.
हा अपघात येवढा भीषण होता की, मोटारसायकिलवरील दोघे जागीच ठार झाले व इश्वर सिध्देश्वर जाधव ( वय 10 ) हा गंभीर जखमी झाला. भरधाव कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली तर मोटारसायकिल चकनाचुर झाली आहे. सदर कार मध्ये सातजण होते त्यातील नामदेव हेडे ( वय 44 ), परमेश्वर खेमाजी पवार ( वय 45 ), प्रीती विनोद पोखरकर ( वय 35), भारत अबाजी माने , किशोर रामभाऊ ठाकुर ( वय 37 ), ज्योती शंकर जण जखमी झाले. हे सर्व शिक्षक आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे मृत्यूस जबाबदार ठरल्याबद्दल कार चालकावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.