जमियत उलेमा महाराष्ट्र च्यावतीने मा.अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अल्लाहचे नामस्मरण केल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मारहाण झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जमियत उलेमा महाराष्ट्र च्या वतीने मा.अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेनाद्वारे करण्यात आली आहे.

अकोला येथील रहिवासी नामे गुलनाज खान इरशाद खान ही महिला प्रसूतीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात सिझेरियन साठी ऑपरेशन रूम मध्ये असताना सदर महिलेने अल्लाह चे नामस्मरण केले यावर जातीयवादी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला मारहाण करत तुझा अल्लाह तुला वाचवणार नाही अल्लाह चे तुझ्या देवाचे नाव घेऊ नकोस तुझा अल्ला तुला वाचविण्यासाठी येणार नाही असे म्हणत तोंडावर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यावेळी हा वैद्यकीय स्टाफ एकमेका सोबत थट्टा मस्करी करत “हमको पीनी है..” असे गाणे म्हणत त्या महिला सोबत जाणीवपुर्वक भेदभावपूर्ण वागणूक देत होते तसेच त्यांनी त्या महिलेला उद्देशून असे म्हटले की काय खाऊन इतका वजन वाढविला आहे आता तुझा शंभर किलो वजन कोण उचलणार. ही बाब अत्यंत गंभीर असून याविषयी पीडित महिलेच्या पती द्वारे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

नसता लोकशाही मार्गाने पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सविस्तर तपासणी करून संबंधित वैद्यकीय स्टाफवर कडक कारवाई करावी अशी विनंती, नसता लोकशाही मार्गाने पूर्ण महाराष्ट्रात आंदोलने करण्यात येईल. निवेदन देण्यासाठी जमियत उलेमा महाराष्ट्रचे राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष हाफिज जाकेर सिद्दिकी, मौलाना अब्दुल बाकी हुस्समी, मुफ्ती अतिक उर रहमान कासमी, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष एडोकेट शफीक भाऊ, गटनेते फारुक पटेल, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, अश्फाक इनामदार, ईलयास टेलर, डॉ. सिराज खान आरजू , बरकत लाला, रफिक बागवान, अलीम पटेल, हाफीज जुनेद, एडोकेट शेख नदीम, हाफिज अब्दुल वाहिद आदी उपस्थित होते.
