आतापर्यंत 20 हजार लोकांनी घेतला लाभ, सोबत वेळ व पैश्याचीही बचत : सलीम जहाँगीर यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एकेकाळी पासपोर्ट म्हटले की कोणी जास्त भानगडीत पडत नव्हत. पासपोर्ट मिळविणे ही किचकट व वेळखाउ प्रक्रिया होती. तेंव्हा अर्ज सादर करण्यापासुन ते पासपोर्ट मिळविण्यापर्यंत मुंबई, पुण्याच्या चकरा माराव्या लागत होत्या. बीडमध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल यांची कोणी कल्पना ही करवत नव्हतं. मात्र बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बीडला केवळ पासपोर्ट कार्यालय ही आणलं. आतापर्यंत तब्बल 20 हजार नागरिकांनी पासपोर्ट मिळविले असून खा. मुंडे यांना हजारो लोकांच आशिर्वाद मिळत असल्याचे मत भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केले.
लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील लोकांसाठी काही करता येणे ही खूप मोठी जबाबदारी अंतर्मनातुन पार पाडली जाते. ज्या कामासाठी मुंबईला जावे लागायचे, दोन दोन दिवस तिथेच थांबावे लागत, अनेक हेलपाटे मारावे लागायचे, वेळ आणि पैसा जाऊनही कामे होत नव्हती.
नेमकी हीच अडचण जाणून घेत खा. प्रितमताई मुंडे यांनी बीडला पासपोर्ट कार्यालय आणले. या कार्यालयाच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 20 हजार नागरिकांनी पासपोर्ट मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रितमताईंना हजारो लोकांचे आशिर्वाद मिळतायत असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.
बीड जिल्हावासियांनी आतापर्यंत वीस हजार पासपोर्ट बनवून घेतले आहेत. जिल्ह्यातील जनतेला नोकरी व व्यवसाया बरोबरच शैक्षणिक कामाकरिता आणि हज, उमरा, तीर्थक्षेत्र याठिकाणी जाण्याकरिता पासपोर्टची अत्यंत आवश्यकता असायची. त्यासाठी मुंबई आणि पुण्याच्या चकरा घालाव्या लागत. मात्र बीडमध्ये झालेल्या कार्यालयामुळे त्या वाचल्या असून जिल्हावासियांचे करोडो रुपयांची बचत झाली आहे. जनता खासदार प्रीतमताई मुंडे यांना आशीर्वाद देत असून त्याचा आनंद होत असल्याचे सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.
सलीमभाईंची मेहनत रंगलाई !
भाजपा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सलीम जहांगीर यांच्याकडे अनेक लोक पासपोर्टसाठी पुण्या-मुंबईच्या एवढया चकरा मारल्या तरीही पासपोर्ट मिळाले नाहीं, पासपोर्ट कार्यालयाने अमुक-अमुक त्रुटी काढली आहे.त्याची पूर्तता करण्यास सांगितले आता त्यानंतरच पासपोर्ट मिळेल असे सांगत असत. यात संबंधित लोकांचा वेळ व पैसा ही खर्च होत असे. बीडला पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी सलीम सलीम जहांगीर यांनी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
डाकघर ची टीम तत्पर, पासपोर्ट चे काम सुरळीत सुरू
पासपोर्ट कार्यालयात डाकघर अधीक्षक एस. एम. अली यांच्या मार्गदर्शनाखाली डाक सहाय्यक संजय देशमुख, बाबासाहेब जाधव हे कर्मचारी उत्कृष्टपणे काम करत असून जनतेला सेवा देत आहेत. सलीम जहाँगीर नुकतेच स्वत: पासपोर्ट नुतनीकरण कामानिमित्त कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाºयांची भेट घेउन पासपोर्ट कार्यालयाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी आतापर्यंत साधारणत: वीस हजार पासपोर्ट जारी करण्यात आले आहे. पासपोर्ट काढण्यापासुन ते नुतनीकरण बाबत कांही अडचणी येत असल्यास स्थानिक पातळीवर सोडविल्या जातात. नागरीकांना तत्पर सेवा देण्याचा आम्ही पुरेपुर प्रयत्न करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सलीम जहांगीर यांनी पासपार्ट कार्यालयाच्या एकंदरीत कामकाजाबददल समाधान व्यक्त केले.