ई-श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी-जिल्हाधिकारी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
असंघटीत कामगार नोंदणीसाठी जिल्ह्यास ई श्रम पोर्टलचे दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी उद्धघाटन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना अमलात आणल्या जाणार असून सद्यस्थितीत NDUW अंतर्गत नोंदणीकृत कामगारांस प्रधानमंत्री सुरक्षा विमा लागू राहील. नोंदणीकृत कामगारांचा एक वर्षाचा हाप्ता 12 रुपये केंद्र शासनामार्फत भरला जाणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 10 लाख 90 हजार 881 एवढे असंघटीत कामगारांच्या नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले आहे.
नोंदणीसाठी पात्रता : असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्षे 16 ते 59 दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड,बँक पासबुक ( राष्ट्रीयकृत बॅक अथवा IFSC कोड असलेली इतर कोणतिही बँक), सक्रिय मोबाईल क्रमांक, स्वयंम नोंदणी करण्यासाठी कामगाराचा सक्रिय मोबाईल कमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. नोंदणी कोठे करावी स्वत:, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र eSHRM Portal URL:eshrm.gov.in चौकशीसाठी हेल्पलाईन राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 14434, टोल फ्री क्रमांक 18001374150
असंघटित कामगारांची नोंदणीची कार्यपध्दती : केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार असंघटित कामगारांची नोंदणीची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे. नागरी सुविधा केंद्रामार्फत बॅक खात्यीचा तपशील, ईमेल आयडी, वारसाचा तपशील व सक्रिय मोबाईल क्रमांक याबाबतचा तपशील अद्यावत केला जाणार आहे. कामगारांची नोंदणी पक्रिया पूर्ण झाल्यास कामगारास नागरी सुविधा केंद्रातील प्रतिनिधीकडून A – 4 साईज पेपरवर UAN कार्ड काढून देण्यात येणार आहे. कामगारांना नवीन नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, परंतू कामगारास कोणतीही माहिती अद्यावत करावयाची असल्यास 20 रुपये नागरी सुविधा केंद्राती प्रतिनिधीकडून आकारले जातील. कामगारांची नोंदणी झाल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) चे वर्षाचे वार्षिक अंशदान 12 रुपये केंद्र शासना मार्फत देण्यात येतील.
असंघटीत क्षेत्रात या कामगार, व्यक्तींचा समावेश
उसतोड कामगार, शेती काम करणारी व्यक्ती, ऑटोचालक/रिक्षाचालक, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, पेंटर, इलेक्ट्रिशियन, पलंबर, मनरेगा मजूर,वीट भटटी कामगार, सुतार काम करणारी व्यक्ती, घरकाम करणारी महिला, न्हावी कामगार, रस्त्यवरील विक्रेते, ब्युटी पार्लर कामगार महिला, फेरीवाले/भाजीवाला/फळवाले, माथाडी कामगार, बांधकाम कामगार, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका, वृत्तपत्र विक्रेते, पीठ गिरणी कामगार, लहन शेतकरी, पशुपालन करणारे कामगार, चहा विक्रेते अशा असंघटीत क्षेत्रात विविध क्षेत्रातील 300 क्षेत्रातील कामगार व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यासाठी देण्यात आलेले उदिष्ट साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय यंत्रणा तलाठी, ग्रामसेवक इत्यादीच्या माध्यमातून नागरी सुविध केंद्राचे जिल्हा प्रबंधक यांनी कामगारांसोबत बैठकीचे आयोजन करुन मार्गदर्शन करावे तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगार व्यक्ती यांनी ई-श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी.
राधाबिनोद शर्मा,
जिल्हाधिकारी’ बीड