अनेक गटात विखुरलेल्या शिवसैनिकांची मोट बांधण्याचे आव्हान
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख पदी अनुभवी अनिल जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन गेली चार महिण्यांपासुन रिक्त असलेला पदावर ही निवड झाली आहे.
अनिल जगताप यापूर्वी बीड जिल्हाप्रमुख म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. जवळपास 13 वर्ष त्यांनी हे पद भूषविले. नोव्हेंबर 2021 मध्ये तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने कार्यवाही करीत जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली होती. दरम्यान अनेक आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह कांहीनी ‘मातोश्री’ च्या दरबारी हाजरी लावत आपली दावेदारी सांगितली होती. शिवसेनेचा पुढील जिल्हाप्रमुख कोण राहणार यावर तर्कवितर्क लडविले जाते होते. अखेर अनिल जगताप जिलाप्रमुख पदाचा प्रभार सोपविल्याने चर्चेला पुर्णविराम लागला आहे.
ही नियुक्ती होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी तत्वावर करण्यात आलेली आहे. कार्याचा आढावा घेऊन ही नियुक्ती कायम करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. आगामी निवडणूका जाहिर होण्यापूर्वी आपली निवड सार्थ ठरविण्याबरोबरच अनेक गटात विखुरलेल्या शिवसैनिकांची मोट बांधण्यात यशस्वी होण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे.
जगताप समर्थकात आनंदाचे वातावरण
शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले अनिल जगताप यांच्या नेतृत्वावर शिवेसेनेने पुन्हा एकदा विश्वास ठेवत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्याने समर्थकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.