नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत 50 लाखांचा निधी ; आ.संदीप क्षीरसागर यांनी लक्ष देवून प्रश्न मार्गी लावला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड शहरातील व तालुक्यातील भाजी पाला, फळे पुरवठ्याचे केंद्रबिंदु असलेल्या खासबाग येथील स्व.केशरकाकू क्षीरसागर फ्रुट आडत मार्केटमध्ये शेतकर्यांना सोयी सुविधा मिळाव्या याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत 50 लक्ष रूपयांचा निधी मंजुर केला असून या फ्रुट आडत मार्केटच्या विकास कामाला प्रत्यक्षात लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.

रविवारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी आडत मार्केट येथे भेट देउन आडत व्यापारी, शेतकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, बरकत पठाण, अश्फाक इनामदार, परवेज देशमुख, वकील अहमद सर, शेख रोहिल, मसूद खान आदि सह उपस्थित होते.
तालुक्यात स्व.केशरकाकू क्षीरसागर फु्रट आडत मार्केटमधून फळे आणि भाजी पाल्याचा पुरवठा होतो. परंतू या ठिकाणी अद्याप कुठल्याही प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा शेतकर्यांना व व्यापार्यांना मिळत नव्हत्या. तालुक्याचे महत्त्वाचे मार्केट असूनही या ठिकाणची अवस्था दयनीय होती. या ठिकाणी नगर परिषदेकडून केवळ गाळे बांधून ठेवण्यात आले होते. परंतू या परिसरामध्ये सुविधा अभावी शेतकर्यांना त्रस्त व्हावे लागत होते.

या विषयाकडे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत 50 लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधी अंतर्गत होणार्या काम अंतर्गत महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छता, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पावर बसवणे, भाजीपाला विक्री मैदानामध्ये पेव्हर ब्लॉक बसवण इत्यादी कामे केली जाणार आहेत. यामुळे तालुकाभरातील भाजीपाला व फळे घेवून येणार्या कामगार, शेतकर्यांना या सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे.
या विकास कामांचे लवकरच प्रत्यक्षपणे काम सुरू होणार आहे. यामुळे शेतकरी, कामगार आणि येथील व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व समाजाच्या व्यापारी बांधवांनी अभिनंदन करून आभार मानले.
