जागतिक महिला दिवस साजरा : लिंक वर्कर्स आणि युक्रेनहून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
समाजकार्याचा योग नशीबाने मिळत असतो. ग्रामीण विकास मंडळ मार्फत कार्य करणा-या महिलांना नोकरी व समाजकार्य असा दूहेरी संयोग प्राप्त झालेला आहे. यामुळे समाजकार्यात स्वत:ला झोकुन देऊन कार्य करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आरआर तडवी यांनी केले. तर जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, एडस् पॉजिटीव्हसह जीवन जगणा-या व्यक्तींसोबत भेदभाव व तुच्छ वागणूक दिली जाते. समाजात जनजागृृती होने ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
जागतिक महिला दिवस व ग्रामीण विकास मंडळ च्या 36 व्या वर्धापनदिना निमित्त गुरूवारी (दि. 10) सकाळी बीड शहरातील स्वाधार गृह (बालेपीर) येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना श्री. तडवी व साधना गंगावणे यांनी वरील विधान केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष चे जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगावणे, इन्फंट इंडीया चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे व सध्या बारगजे, उमेदच्या व्यवस्थापक आशा पवार, रश्मी गोसावी, बालिका पडवळ, डॉ. सय्यद आईशा तनवीर (पॅथॉलॉजिस्ट, जेद्दाह, सौदी अरेबिया), सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस. बी. सय्यद, सचिव गायकवाड तुकाराम, आयसीटीसी चे श्री. माचपल्ले, आनंदग्राम चे प्रकल्प प्रमुख संगीताताई, स्वाधार गृहाच्या अधिक्षिका आशा धनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या प्रास्तावितपर भाषणात ग्रामीण विकास मंडळ चे अध्यक्ष तथा कार्यक्रमा चे आयोजक सय्यद एसबी म्हणाले की, वर्षभरातील 365 दिवसांत वेगवेगळे दिवस साजरे केले जातात त्यात महिला दिवस का सर्वात शक्तीशाली असा आहे. महिलांचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. अशा या कर्तृत्वान महिलांचा सम्मान करने हे आमचे कर्तव्य आहे. आणि योगायोगाने संस्थेची स्थापना ही गेली 36 वर्षांपूर्वी 8 मार्च रोजी झाल्याने आम्ही दर वर्षी जागतिक महिला दिवस व संस्थेचा वर्धापन दिवस एकत्रित साजरा करतोत असे ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी सांगितले की, स्त्री वेगवेगळ्या भूमिकेत वावरते. तर पुरूष मान-सन्मानाचा भूकेला आहे असे नमूद करून ते म्हणाले की, बुध्दांनी देखील स्त्री ची महिमा अधोरेखीत केली होती म्हणून तर त्यांनी स्त्री सर्वात थोर असल्याचे म्हटले आहे. महिलांनी आपली महती सिध्द करून दाखविली आहे. ग्रामीण विकास मंडळ चे अध्यक्ष तथा तथा थोर समाजसेवक सय्यद सर यांना पाहुनच मी समाजसेवेत आलो. समाजकार्य करतांना खूप त्रास, वेदना, कष्ट सहन कराव्या लागतात. मात्र आपण आपल्या लक्ष्यपूर्तिच्या दिशेने मार्गक्रमण करीत रहावे असा मोलाचा सल्ला बारगजे यांनी दिला.
समाजसेवक एसबी सय्यद यांच्या कर्तत्ववान अशा कन्या डॉ. सय्यद आईशा यांनी सांगितले की, परदेशात वैद्यकीय सेवा देत असतांना मात्र मला मायभूमिचे वेध लागलेले असते. यामुळे अधुन-मधुन मी भारतात येत असते. डॉ. आईशा पुढे म्हणाल्या की, वडीलांना लहाणपणापासुन समाजकार्य करतांना पाहिले आहे. भविष्यात समाजकार्य करण्याची माझी ही ईच्छा असल्याच्या त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर वाघमारे यांनी केले. तर आभार सय्यद जाफर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे गोरे प्रतिभा, सय्यद जाफर गणी, ज्ञानोबा माउली, सय्यद हमजा, उमेश होमकर, शेख मुनसब आदिंनी मेहनत घेतली.
लिंक वर्कर्स सन्मानित
या कार्यक्रमादरम्यान ग्रामीण विकास मंडळ मार्फत जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या स्कीम मध्ये 2021-22 या वर्षांत उत्कृष्ट कार्य करणा-या 5 लिंक वर्कर्स चा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले. यात मंगल इके, घुगे किश्किंदा, शेख शाहीन, खवतड अंगद, कदम अंनिता यांचा समावेश आहे.
युक्रेनहून मायभूमित परतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
रशिया-युक्रेन मध्ये युध्द सुरू आहे. तेथे विध्वंसक घटना घडत आहेत अशा स्थितीत तेथे जीव धोक्यात घालून हिम्मतीने राहिले व आपल्या मायभूमि सुखरूप परत आलेले विद्यार्थी अनिलकुमार तेजाराम (माजलगाव), अंदलिब मेराज हाश्मी (गेवराई), व आकाश कल्याण बावळे (बीड) यांच्या सह पालकांचा ग्रामीण विकास मंडळच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून आलेल्या विद्यार्थ्यांनी युक्रेन मध्ये आलेले अनुभव व तेथून मायदेशी परत येण्याचा सर्व प्रवास कथन केला. आकाश बावळे यांने उपस्थितांना आपबिती सुनावली तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी आकाश ने केंद्र सरकार व परराष्ट मंत्रालयाने तत्परतेने केलेली मदद यामुळे आम्ही सुखरूप परतले असून आम्ही भारत देशात पोहचल्यानंतर येथे आम्हाला सुरक्षित वाटते. भारत इज ग्रेट, सारे जहां से अच्छा हिंदूस्तां हमारा असल्याचे अभीमानाने सांगितले तेंव्हा उपस्थितांचा ऊर अभिमानाने भरून आला.