अलहुदा उर्दू हायस्कूल बीड येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करावा तसेच महामारीच्या काळात काय करावे व काय करू नये या विषयी ज्ञान बाळगावे व ते अमलात आणावे असे प्रतिपादन मॅक्सक्योर हॉस्पिटलचे संचालक तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ शेख फेरोज यांनी केले.
नुर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी बीड द्वारा संचालित अलहुदा उर्दू हायस्कूल, बीड येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष लालसाहब हनगी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शेख फेरोज, वरिष्ठ पत्रकार अॅड शेखर कुमार आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक डॉ सिराज खान आरजू यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेत होणाºया विविध शैक्षणिक उपक्रमा बद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी सहशिक्षक शेख मोइजोद्दीन व सय्यद रहबर व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
अॅड शेखर कुमार विद्यार्र्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ध्येय प्राप्तीसाठी अंगी जिद्द व मेहनत करण्याची तयारी असावी. अध्यक्षीय भाषण करताना नुर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष लालसाहब हनगी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी इमानदारीने मेहनत करावी. यशाला गवसनी घालण्यासाठी निरंतर मेहनत व पाठपुरावा करावा लागतो. धरसोड करणाºया व्यक्तीच्या पदरी नेहमी अपयश असतं. तुमचे श्रम, वेळ, लक्ष, मेहनत विखुरले जाऊ नये याकडे लक्ष द्या.
कार्यक्र मात पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीयांना विविध पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी सय्यद मुबशिरा व सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख अब्दुल हमीद यांनी केले. सहशिक्षक मुहम्मद रफीक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्र म यशस्वी करण्या साठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शेख रफीक, शेख मसुद, युनूस खान आदींनी परिश्रम घेतले.