जागतिक महिला दिनानिमित्त महिला व पालक मेळाव्यात गौतम खठोड यांचे प्रतिपादन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिला परीषद शाळेतील मुले गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. पालकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मेहनतीने वाढते. गरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण द्या असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा प्रसिध्द समाजसेवक गौतम खटोड यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जि.प.प्रा.शा. केंद्र अशोकनगर बीड येथे मंगळवारी महिला व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शिक्षक व पालकांना उद्देशून श्री. खटोड बोलत होते. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक धर्मराज मागदे, प्रमुख अतिथी डावकर मॅडम, मुख्याध्यापक शेख मुसा हे उपस्थित होते.
यावेळी गौतम खटोड यांनी अध्ययन निष्पत्ती पन्नास दिवसांच्या शैक्षणकि साहित्यासाठी पाच हजार रूपयांची देणगी सुध्दा देत प्रतिष्ठान शैक्षणिक साहित्य देण्यास सदैव तैयार राहील असे सांगितले. प्रमुख अतिथी डावकर मॅडम म्हणाल्या की महिलांनी मनावर घेतलं तर मुले शैक्षणिक क्रांती घडू शकतात. त्यासाठी आपली जबाबदारी समजून प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या वेळी महिला दिनानिमित्त शाळेच्या मुलांनी इंग्रजीत भाषणे केली. तर विविध विषयांवर औताने, कागदे, शेख, मोराळे यांची उत्कृष्ट झाली. या वेळी महिलांचा पालकाचा खेळ भारती मॅडम यांनी घेतला.प्रास्तावीक चित्रा मठकरी यांनी तर सुञसंचलन शोभा कदम यांनी केले. आभार संगीता वाघमारे यांनी मानले.
कार्यक्र मास सहकार्य मंगल चव्हाण, सुरेखा चव्हाण, अनोळे मॅडम, मनिषा काकडे, विठ्ठल जायभाय, सखाराम शिंदे, भोन्जीबा फुंदे, नितीन भोसले केले. तर मुख्याध्यापक शेख मुसा यांनी एक दिवसात नियोजन केले. सदर कार्यक्र मास महिला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.