By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकारणात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने रविंद्र क्षीरसागर यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
मुद्रांक नोंदणी कार्यालय (रजिस्ट्री कार्यालय) परिसरात जमिनीच्या वादातून 25 फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला व कथित लूटीची घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर प्रतिभा क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून रविंद्र क्षीरसागर यांच्यासह हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी, आनंद पवार, गणेश भरनाळे आणि अशोक रोमण यांच्याविरु द्ध हत्येचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, रविंद्र क्षीरसागर यांनी अॅड. बी. डी. कोल्हे यांच्यामार्फत 5वे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी.डोके यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. या जामीन अर्जावर सुनावणीच्या सुरू असल्याने तोपर्यंत अंतरिम जामीन मंजूर व्हावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने रविंद्र क्षीरसागर दिलासा मिळाला आहे. क्षीरसागर यांच्या वतीने अॅड. बी डी कोल्हे यांनी बाजु मांडली.