एनएसईच्या व्यवहारांमध्ये मोठी अनियमितता, कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट
By MahaTimes ऑनलाइन – नवी दिल्ली |
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange – एनएसई) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने (CBI) रविवारी रात्री उशिरा अटक (Arrest) केली. सेबी (SEBI) ने या प्रकरणी काढलेल्या 190 पानी आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एनएसईमथ्ये कार्यरत असताना चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) या कथित योगी (शिरोमणी) च्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘एनएसईचा व्यवहार (NSE Scam) एका साधूच्या आदेशानुसार चालतो असा खळबळजनक दावा चित्रा रामकृष्ण यांनी सेबीच्या चौकशीदरम्यान केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. चित्रा रामकृष्ण यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. त्यांच्या घराची झड़ती देखील घेण्यात आली, मात्र त्यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना दिल्लीमथून अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रामकृष्ण यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना सीबीआयच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
‘एनएसईच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने चित्रा रामकृष्ण यांची सेबीकडून देखील चौकशी सुरू आहे. व्यवहार अनियमितते प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे, त्यांच्या घराची झड़ती देखील घेण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यानी दिली आहे. एनएसई को-लोकेशन’ प्रकरणात सीबीआयने अलीकडेच रामकृष्ण यांची चौकशी केली होती.

आयकर विभागाने यापूर्वी मुंबई आणि चेन्नई येथील चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. एनएसईमथ्ये कार्यरत असताना रामकृष्ण या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या मागील वीस वर्षापासून योगीच्या संपर्कात होत्या. त्या योगीला शिरोमणी असं म्हणत होत्या पण त्याला कधीही पाहिले नसल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रत्यक्षात सेबीच्या तपासात त्यांनी अनेकवेळा या योगीची भेट घेतल्याचे समोर आले आहे.