कायदा- सुव्यवस्था हाताळण्यात अपयशाचा ठपका, विधानसभेत आमदारांनी लक्षवेधी मांडून केली चौकशीची मागणी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था हताळण्यात बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी (आर. राजा) अपयशी ठरल्याप्रकरणी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी मांडत सत्ताधारी व विपक्षीय आमदारांनी आवाज उठवला. याची तात्काळ दखल घेत ग्रह विभागाने बीडच्या एसपींवर तात्काळ कार्यवाही करीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. याच बरोबर सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
मागील कांही दिवसांपासून बीड जिल्ह्यात खून, खूनाचा प्रशत्न, चोरी, लूटमारीच्या घटना घडत आहे. दूसरीकडे अवैध धंदे ही जोमात सुरू आहेत. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांनाच आज सोमवारी विधानसभेत राष्ट्रवादी चे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार आजबे यांनी लक्षवेधी मांडून पोलीस अधीक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. त्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा आमदार नमीता मुंदडा यांनी देखील बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून चौकशी ची मागणी केली. केजच्या आमदार नमीता मुंदडा यांनी तर आपबिती कथन करीत एक महिला आमदार सुरक्षित नसेल तर सामान्य महिलांचे काय असा सवाल उपस्थित करीत बीड जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिह्न उपस्थित केला होता.
एका महिला आमदारासोबत कांही नशेखोरांनी फोटो काढण्यासाठी जबरदस्ती केली. पोलीस एक तासानंतर पोहचली तर या गंभीर प्रकाराची अंबाजोगाई चे उप विभागीय पुलिस अधिकारी, पुलिस अधीक्षक यांनी साधी तसदी देखील घेतली नसल्याचा आरोप केला. यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करत एसपी आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.