तूर्तास दिलासा : आता जामीन अर्जावर पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बहुचर्चित गोळीबार प्रकरणात माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे पिता-पुत्रास तूर्तास दिलासा मिळाला असून आता येत्या 5 मार्चला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
मुद्रांक नोंदणी कार्यालय (रजिस्ट्री कार्यालय) परिसरात जमिनीच्या वादातून 25 फेब्रुवारी रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सतीश बबनराव क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून सतीश पवार, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, माजी नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह आठ जणांविरु द्ध हत्येचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, डॉ.भारतभूषण क्षीरसागर व डॉ.योगेश क्षीरसागर यांनी क्षीरसागर पुत्र यांनी स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर सुनावणीच्या सुरू असल्याने तोपर्यंत अंतरिम जामीन मंजूर व्हावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. बुधवारी सकाळी न्यायालयात अंतरिम सुनावणी झाली. पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी.डोके यांच्या न्यायालयाने दोघांनाही अंतरिम जामीन मंजूर केल्याने दोघांना अटकेतून तूर्तास दिलासा मिळाला आहे.
आता जामीन अर्जावर पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे. क्षीरसागर पिता-पुत्राच्या वतीने अॅड. मिलिंद वाघीरकर, अॅड. अविनाश गंडले यांनी बाजु मांडली. त्यांनी न्यायालयास पटवून दिले की हा गुन्हा हेतूपुरस्स दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा आरोपीतांशी अर्थाअर्थी संबंध नाही. अथवा आरोपी हे प्रतिष्ठीत असल्याने त्यांचा पळून जाण्याचा ही काही संबंध नाही. तर प्रतिवादीच्या वतीने बी.डी.कोल्हे यांनी अंतरिम जामिनाला विरोध दर्शविला होता.