थोर शास्त्रज्ञ व्ही रमन यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान परिषदेचे उदघाटन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राष्ट्रीय विज्ञान, गणित दिवस थोर शास्त्रज्ञ व्ही रमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहीती प्रयोगाद्वारे समजावून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षण दिल्यास ते शिक्षण चिरकाल टिकते व विद्यार्थ्यी अंधश्रद्धेकडे कधीच वळत नाही असे प्रतिपादन मुख्य लेखा वित्त अधिकारी जि.प.बीड मा.जटाळे साहेब यांनी केले.

मुख्य लेखा वित्त अधिकारी जि.प.बीड मा.जटाळे साहेब यांनी आज जि.प.मोमीनपूरा, उर्दू केंद्र अशोकनगर बीड येथे विज्ञान परिषदेस भेट देऊन शिक्षकांच्या शिकवणीतून मुलांनी तैयार केलेल्या प्रयोगांची माहीती घेतली उत्कृष्ट प्रयोग सादरीकरण केल्याबद्दल त्यानी मुलांचे कौतुक केले.

या वेळी मा. जटाळे मुख्य लेखा वित्त अधिकारी जि.प.बीड यांचे शाळेच्या व केंद्राच्या वतीने मुख्याध्यापक शेख मुसा, शेख आलीया सिद्दीका, शेख वजीर, हकीम मनीयार तथा सर्व शिक्षकांनी सत्कार केला. विज्ञान परिषदेचे उदघाटन मा.जटाळे साहेब, शेख मुसा, आलीया सिद्दीका, शेख वजीर, हकीम मनीयार तथा सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्याच्या उपस्थित केले. जटाळे साहेब यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक व मुलांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले.