By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील सहनिबंधक व मुद्रांक नोंदणी कार्यालयात शुक्रवारी ( दि.25) रोजी सकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणात मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या कांही तासांत विरोधी गटाकडून दाखिल तक्रारीनुसार आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर व बंधू मा. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्यासह सात जणांविरोधात शिवाजीनगर ठाण्यात दरोडा (395) व जीवे मारण्याचा प्रयत्न (307) यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील कांही दिवसांपासून सुरू असलेला क्षीरसागर काका-पुतण्यातील संघर्ष विकोपाला गेल्याचे यावरून दिसुन येत आहे. शिवाजीनगर ठाण्यात माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या तक्र ारीनुसार त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता. 25 फेब्रुवारी रोजी खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे बंधू सतीश पवार हे सहनिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
यावेळी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारु क सिद्दीकी, आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण व इतरांनी रजिस्ट्री का करतो असे म्हणून यावेळी साडेपाच लाख रु पयांची पैशांची बॅग हिसकावली. कुकरीसारखे हत्यारे व लाकडी दांडे घेवून सर्वजण सतिश पवार याला मारण्यासाठी गेले असता सतिश पवार याने त्याच्याकडील परवाना धारक रिव्हॉल्व्हर काढुन स्व संरक्षणासाठी हवेत फायर केला. तरीही लोक त्याच्या अंगावर चाल करून जात असल्याने त्याने जिव वाचवण्याच्या उद्देशाने जमिनीवर फायर केले असे फिर्यादीत नमुद केले आहे. यावरून कलम 307, 395, 147, 148, 149 सह कलम आर्म अॅक्ट 135 मपोका अधिनियम प्रमाणगुन्हा दाखल नोंद झाला आहे.