प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र
By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अंबाजोगाई तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका, माजी आमदार अमरसिंह पंडित, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक आबा डक, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, युवती आघाडीच्या अध्यक्ष कु. सक्षणा सलगर आदींची उपस्थिती होती.
राजेश्वर आबा चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासूनचे सदस्य असून खा. पवार साहेबांचे निष्ठावंत मानले जातात. याआधी म्हाडाचे सदस्य, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषवली आहेत. श्री. राजेश्वर आबा चव्हाण यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
दरम्यान नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जोपासत बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करत, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहेत.