दोन जण जखमी, शहरात खळबळ
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक नोंदणी कार्यालय (रजिष्ट्री ऑफिस) समोर शुक्रवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली. यात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जमिनीच्या वादातून ही घडली असून यात सतीश क्षीरसागर (30, लक्ष्मणनगर, बीड) व फारूख सिद्दीकी (28, जालना रोड, बीड) जखमी झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
यात दोघे पायाला गोळी लागून जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून जख़्मीना औरंगाबाद ला हलविले आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक रश्मिथा राव, पोलिस उपाधिक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड, उप निरीक्षक मीना तुपे आदिंनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. अधिक तपास सुरू आहे.
जमीनीच्या वादातून गोळीबारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एक कारतुस घटनास्थळी मिळाल्याने एक राउंड फायर झाल्याचे दिसुन येते. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. कार्यालय आवारात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याची हार्डडिस्क आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येईल.
राजा रामास्वामी,
पोलिस अधिक्षक, बीड
गोळीबार प्रकरण वेगळ्यावळणावर…
जखमीचा जबाबावरून या दिग्गजावर गुन्हा नोंद
शुक्रवारी सकाळी जागेच्यावादातून बीड शहरात झालेल्या गोळीबारात जखमी सतीश बबनराव क्षीरसागर याच्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर, सतीश पवार सह आठ जणांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात रात्री उशीराने कलम 307 सह अन्य कलमानुसार गुन्हा नोंद झाला आहे.
शुक्रवारी सकाळी जागेच्यावादातून झालेला गोळीबार प्रकरण वेगळ्यावळणावर गेला आहे. गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेला काका-पुतण्याचा वाद आता शिगेला पोहोचला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक नोंदणी कार्यालय (रजिष्ट्री ऑफिस) समोर शुक्रवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली होती. यात सतीश क्षीरसागर सह दोघे जण जखमी झाले होते. जखमींवर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करून औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली होती.
दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक रश्मिथा राव, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळकेसह पोलिस अधिकारी कर्मचा-यांचा लवाजमा घटनास्थळी दाखल झाला होता. रजिष्ट्री कार्यालयाला कधी नव्हे ते छावणीचे स्वरूप आले होते. आता थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचा तपास पीएसआय बाळराजे दराडे करीत आहेत.