महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मुळव्याधसारख्या आजाराच्या रुग्णांसाठी सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलच्या वतीने बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी शिबीर शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या रुग्णांना उपचारातही मोठी सूट देण्यात येणार असल्याची माहिती मुळव्याध तज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी दिली.

तपासणी न केल्यामुळे मुळव्याध हा आजार वाढतच जातो. त्यामुळे मुळव्याध-भगंदर-फिशरचे लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. हे शिबीर बीड शहरातील जालना रोड येथील सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल येथे होणार आहे.
शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत करण्यात आले असून तज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासण्या करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची देखील उपस्थिती राहणार असल्याची माहिती डॉ. अमोल खेत्रे यांनी दिली.
या शिबिराचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन मुळव्याध तज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी केले आहे.