By MahaTimes ऑनलाइन – बीड |
ज्येष्ठ समाजसेवक मोईन मास्टर यांना उर्दू दै.अल हिलाल टाइम्स व बज्म शमा-ए-अदबच्यावतीने कोविड -19 संक्रमणकाळात आपले जीव धोक्यात घालुन दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कोरोनायोध्दा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

शहरातील मिना फंक्शन हॉल येथे मंगळवारी (दि. 23) हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. सय्यद सलीम हे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. सुनील धांडे, माजी आ. अॅड. सिराज देशमुख, उप नगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, प्राचार्य इलियास फाजिल, शकील खान, संपादक मोहम्मद खमरूल इमानखान यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोईन मास्टर हे राजनितीक, सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करीत आहेत. सामाजिक तळागाळातील उपेक्षित, पीडीतांना न्याय देण्याबरोबरच कोरोना महामारीच्या काळात त्यांनी दिलेले योगदान बहुमूल्य असे आहे. कोरोना बाधितांपासून संसंर्गाची बाधा होऊ नये म्हणून लोक, आप्त नातेवाईक ही दूर पळत होते. कोरोना बळींचा दफनविधी, अंतिमसंस्कार नगर पालिका द्वारे बेवारस प्रमाणे करण्यात येत होते अशा स्थितीत 75 वर्षांचा तरूण मोईन मास्टर आपल्या निवडक सहकाºयांसोबत मिळून कोरोनाबळींचे मृत देह आपल्या ताब्यात घेउन त्यांचे दफनविधी पार पाडले.
एवढेच नव्हे तर लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या पर प्रांतियांना पुलिस व प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या गावी सुखरूप त्यांच्या गावी पाठविण्यासह लॉकडाऊन मध्ये गोरगरीब व सामान्य लोकांच्या भोजनाची व अन्नधान्याचे कीट पुरवण्याची व्यवस्था केली. अशा या महान कोरोनायोध्दास पुलिस व प्रशासनाने सम्मानित केले आहे. स्थानीय उर्दू दै.अल हिलाल टाइम्स व बज्म शमा-ए-अदब च्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक मोईन मास्टर यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी मुज्तबा अहमदखान, नगरसेवक मुखीद लाला, मोहम्मद सादेक, संपादक अय्युब खान, प्रा. जावेद पाशा, सरकार एक्सप्रेस चे संपादक सिराज आरजू, महा टाईम्स चे संपादक रईसखान, वरिष्ठ पत्रकार रफीक नाशाद, पाशा मोमीन, काजी मुजीब आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मो.खमरूल इमानखान यांनी मानले.