मौलाना अब्दुल जब्बार साहब जवाहिरी नक्शबंदी व मौलाना कारी रशीद अहमद साहब अजमेरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार -मुफ्ती जावेद हुसैनी यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शहरातील प्रसिद्ध मदरसा दारुल उलूम बीडचा 60 वा वार्षिक जलसा-ए-आम चे आयोजन गुरूवार, 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या जलसामध्ये 42 हुफ्फाजे किराम यांची दस्तारबंदी (पदवी दान), 10 तलबा-ए-किराम यांचे पूर्ण झालेले जालैन शरीफ आणि 14 मुलांना संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरित आदि कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा जलसा मौलाना अब्दुल जब्बार साहब जवाहिरी नक्शबंदी यांच्या अध्यक्षतेखाली व मौलाना कारी रशीद अहमद साहब अजमेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती दारु ल उलूम बीड चे मुख्याध्यापक मुफ्ती जावेद हुसैनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुफ्ती जावेद हुसैनी यांनी सांगितले की, मदरसा दारूल उलूम बीड हा मराठवाडा विभागातील प्रसिद्ध मदरसा आहे. सहा दशकांपूर्वी या मदरशाची स्थापना करण्यात आली. हा मदरसा उत्तरोत्तर प्रगतिपथावर आहे. कोरोनाकाळात हा मदरसा गेल्या दीड वर्षांपासून बंदच होता. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने गुरूवार, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दारु ल उलूम बीड मैदानात वार्षिक जलसा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या जलसा-ए-आम कार्यक्र मात सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे आवाहन मुख्याध्यापक मुफ्ती जावेद हुसैनी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत मुफ्ती सगीर आलम साहब कासमी, मौलाना अमीन साहब, उपप्राचार्य मौलाना चांदपाशा साहब, मुफ्ती मोहियोद्दीन, मौलाना अब्दुल सत्तार, मौलाना ताहेर, शेख हुसेन, मौलाना मुख्तार साहब, हाफेज शाकेर आदी उपस्थित होते.
मदरशात आदर्श नागरीक घडवला जातो
मौलाना अब्दुल रहीम साहब यांनी सांगितले की, मदरशाबाबत अनेक समज, गैरसमज आहेत. पण आपसातील अंतर कमी झाले तर हे गैरसमज ही दूर होईल. या मदरशांमध्ये मुलांना धार्मि शिक्षणासोबतच त्यांना कौशल्य विकासाचेही शिक्षण ही दिले जात आहे. यासोबतच मुलाने आदर्श नागरिक बनून आपला उदरनिर्वाह कसा करावा. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक आणि इतर लोकांशी कसे वागावे यासह खिदमत-ए-खल्क चे धडे दिले जातात.