अमरसिंह पंडीत यांच्या मागणीला मिळणार यश – संग्राम आहेर
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गेवराई तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या उमापूर ग्रामपंचायतला माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या प्रयत्नामुळे लवकरच नगरपंचायतचा दर्जा मिळणार आहे. अशी माहीती गेवराई खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर यांनी दिली.
गेवराई तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत उमापूरची आहे. लोकसंख्या, मतदारसंख्या, बाजारपेठ मोठी असल्याने या ग्रामपंचायतला नगर पंचायतची करण्याची अनेक दिवसापासून ग्रामस्थांचीमागणी होती. या मागणीची दखल घेवुन माजी जि.प.सदस्य तथा गेवराई खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर यांनी ग्रामस्थांना सोबत घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडीत यांच्या सोबत चर्चा केली.
उमापूर नगर पंचायतचा खुप जुना प्रस्ताव बीड जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहे. हा प्रस्ताव निकाली काढून नगर पंचायतचा दर्जा मीळवुन द्यावा अशी मागणी अमरसिंह पंडित यांच्याकडे केली. अमरसिंह पंडित यांनी याबाबत नगरविकास मंत्र्यासोबत मुंबई येथे बैठक घेवुन उमापूर नगर पंचायतचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी नगर विकास मंत्र्यांकडे केल्यानंतर लवकरच उमापूर ग्राम पंचायतला नगर विकास मंत्रालयातून नगर पंचायतचा दर्जा मीळणार असल्याची माहिती संग्राम आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
उमापूर गावात सार्वजनीक पाणी पूरवठा, वीज, रस्ता, नाली, आरोग्य सर्वच बाबतीत समस्या आहेत. निधीची कमतरता आदी बाबींमुळे नेहमीच समस्या निर्माण होत आहेत. लोकसंख्या सोळा-सतरा हजाराच्या वर आहे. बीगर कृषी व्यवसाय ५० % पेक्षा जास्त आहे. याच बरोबर सात वर्षापूर्वी दाखल केलेला नगर पंचायत दर्जाच्या प्रस्तावात काही तृटी आढळल्यानंतर तृटींची पूर्तता करून अमरसिंह पंडीत यांनी हा प्रस्ताव पुन्हा दाखल केला असून मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेवुन प्रश्न लवकर निकाली लावण्याची मागणी केली आहे.
या मागणीला लवकरच यश मीळून उमापूर ग्राम पंचायतला नगरपंचायतचा दर्जा मीळणार असल्याने उमापूरकरांची अनेक समस्या मार्गी लागणार आहे असेही संग्राम आहेर यांनी शेवटी म्हटले आहे.