स्ट्रॉंग पॉईंट्स क्रिकेट आणि लॉन टेनिस !
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
डॉ भारतभूषणजी क्षीरसागर…म्हणजे,
आयुष्याचे आणि राजकारणाचे भलेभले चेंडू टोलवून खेळ आपल्या बाजूने करणारा धुरंधर खेळाडू !
2005 पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा मी पूर्ण वेळ प्रशिक्षक होतो, 2008 साली संस्थेच्या कांही कामानिमित्त माझी भारतभूषण साहेबांशी भेट झाली. त्या नंतर रोटरी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना बरेचदा भेटण्याचा योग आला आणि सरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू कळायला लागले. खेळ, आणि त्यात क्रिकेट आणि लॉन टेनिस हे दोन खेळ सरांचे विक पॉईंट्स आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत हे माझ्या लक्षात आले.
लॉन टेनिस या खेळामध्ये बॉल समोरच्या कोर्टात असतांना काही क्षण विचार करून, निर्णय घेऊन, तो कृतीत आणून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून गेम फिनिश करण्याची त्यांची हातोटी त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पुरेपूर उतरवली आहे. त्यांच्याबद्दल आज खूप विविध माहितीपर लेख आज लिहून येतील पण योग आणि प्राणायाम शिकवण्याच्या निमित्ताने काही काळ त्याच्यासोबत होतो तेंव्हा सरांमध्ये असलेल्या अत्यंत संवेदनशील माणसाची ओळख मला झाली आहे.
“A successful politician does not have convictions,
He has emotions”. – Ellen Glasgow ….यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष साहेबांच्या यशस्वी राजकारणामागे त्यांच्यामधील संवेदनशील माणूस दडलेला आहे असे मला वाटते.
नाटक, खेळ, चित्रकला, संगीत, वाचन, आयुष्य समृद्ध करणाऱ्या सर्व प्रांतामध्ये परिपूर्ण व्यासंग असलेले धुरंधर आणि तितकेच संवेदनशील राजकारणी, माननीय भारतभूषणजी क्षीरसागर यांना त्यांच्या 64 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून हार्दिक शुभेच्छा.
-हेमंत बडवे