By MahaTimes ऑनलाइन – अंबाजोगाई |
‘हरीत अंबाजोगाई’ ग्रुप च्या वतीने रविवारी (दि. 13) रोजी आनंदनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात युवकांनी वृक्षारोपण, वृक्ष संगोपन व स्वच्छता अभियान राबवून श्रमदान केले.

अंबाजोगाई येथील युवक एकत्रित येत हरित अंबाजोगाई ग्रुपची स्थापना केली. याद्वारे ते सुट्टीचा दिवस व प्रसंगी वृक्षारोपण, वृक्ष संगोपन व स्वच्छता अभियान राबवतात. रविवारी (दि. 13) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हरित अंबाजोगाई ग्रुप पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक यांनी उत्साहात आनंदनगर येथे ठराविक अंतरावर खड्डे खोदून विविध प्रकारची रोपे लावली.

दरम्यान सर्वांनी स्वच्छता अभियान राबवून परीसर स्वच्छ केला. या वृक्षारोपण व श्रमदान अभियानात प्रा.अभिजीत लोहिया, ऐड. प्रशांत शिंदे, प्रशांत पाटिल, प्रा.कल्याण सावंत,विनायक मुंजे,श्रीकांत जोशी, डॉ.शुभदा लोहिया, सौ.पाटिल मैडम, गणेश वेदपाठक, अनंत मलवाड़, आकाश मोरे, गरुदत्त तिवारी, सूरज पवार, अशोक सालपे, विश्वजीत सोनावणे, शैलजा पवार, रेणुका गिरवलकर, विशाल थोरात, धनराज राठौड़, गौरव वाघमारे, अमोल विडेकर, बालासाहेब कराड, मारुती शिंदे, गणेश राठोड़, माधव पांचळ, रिकीबे अप्पा, शंकर केदार,जोगदंड साहेब, माणिक तिड़के,कमलेश पडधड़िया, विशाल जगताप आदिआदींनी सहभाग नोंदवला.