By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मैत्रा फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेमार्फत दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा शहरी बेघर निवारा भाजी मंडई बीड येथे रक्तदान शिबिर तसेच निवारा ग्रहातील बेघरांची आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आलेले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सतत काही रुग्णांना रक्ताची गरज भासत असते .त्याचसाठीची बांधिलकी जपण्यासाठी मैत्रा फाऊंडेशनने सदरील रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. मैत्रा फाऊंडेशन ही संस्था साहित्य,कला, संस्कृती, शिक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारित काम करते.
त्यापैकी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मैत्रा फाउंडेशन ने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहेत तरी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी बारा ते पाच या वेळेमध्ये रक्तदान करावे असे आवाहन संस्थापक श्री.द.ल.वारे, सचिव हर्षा ढाकणे ,सदस्य शीतल बळे,उज्वला वनवे, माधुरी कोठुळे,राज्य समन्वयक राजश्री लाहोर ताठे,मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अनिल तिवारी बीड,जिल्हाध्यक्ष संजय राठोड,जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी शिंदे, संगीता आदमाने तसेच उषा लोंढे,नितीन फसले, आशा भोसले,आशा भारती,विकास घोडके,कचरू तुपे, तुकाराम राठोड, फुलचंद खाडे यांनी केले आहे.