By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या वतीने आयोजित 61 व्या राज्य कला प्रदर्शनात येथील कैलास कला निकेतन च्या चित्रांची निवड झाली आहे.
राज्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी राज्य कला कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कैलास कला निकेतन येथून पाठवण्यात आलेल्या चित्रातून ए.टि.डी. विभागातून मुंबई येथील प्रर्दशनात श्वेता बाळासाहेब जगदाळे हिच्या ‘नेचर-आब्जेक्ट’ या चित्राची तर साक्षी सखाराम शेळके हिच्या डिझाईन 2-डी चित्राची निवड झाली.
तसेच फौंडेशन विभागातून पायल दिलिप पुरी हिच्या डिझाईन 2-डी ची कोलाज मधून तयार करण्यात आलेल्या चित्रांची निवड करण्यात आली आहे. हि निवड संपूर्ण महाराष्ट्रातून झाली आहे. या विद्यार्थीनींना वर्गशिक्षक प्राध्यापक श्रीकांत दहीवाळ, वर्गशिक्षक प्राध्यापक श्रीकांत पुरी यांनी मार्गदर्शन केले.
या निवडीचे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथराव औटे, सचिव दिनकरराव कदम व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य प्रवीण मुखेकर प्रा.श्रीकांत पुरी, प्रा. युवराज घोंगडे, प्रा. श्रीकांत दहीवाळ, अजित कदम सर्व कर्मचारी वृंद यांनी स्वागत केले आहे.