विविध एजन्सीज ला तब्बल 80 कोटी मोजले, इतर खर्चाचा मेळ बसेना
आरटीआय कार्यकर्ता दिपक थोरात आरोप, विभागीय आयुक्तालयासमोर करणार उपोषण
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्ह्यात कोरोना संक्रमण काळात जिल्हा रूग्णालय प्रशासनाने विविध एजन्सीज ला तब्बल 80 कोटी 2 लाख 12 हजार 903 मोजल्याची बाब माहिती अधिकारात उजेडात आली आहे. दरम्यान आरोग्य सुविधेच्या उपाययोजनासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनास पौनेतीनशे कोटी रूपयाचा निधी आला. एकीकडे कोरोनामुळे लोकं मरत असतांना दूसरीकडे कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता दिपक थोरात यांनी केला आहे.
दिपक थोरात यांनी असाही दावा केला की जिल्हा रु ग्णालयांमध्ये कोरोनाकाळात आज पर्यंत शेकडो कोटी रु पयांचा घोटाळा झाला असून याचा आकडा ही त्यांनी सार्वजनिक केला आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते, विद्यमान अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधिर राठोड, तत्कालीन व विद्यमान भांडार प्रमुख, सह बडतर्फ, राजीनामा देऊन गुत्तेदारी केली असे कर्मचारी यांनी संगनमत करून स्वत:च्या नातेवाईकांच्या नावाने व स्वत:च्या नावाने एजन्सी तयार करून बोगस बिले उचलल्याचा आरोप ही श्री. थोरात यांनी केला आहे. संबंधित जिल्हा रुग्णालयात आज बघायला गेलं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा कधीही व्यक्त न करता सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आलेला निधि संगणमताने हडपण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू असल्याचा दावा ही सामाजिक कार्यकर्ता दिपक थोरात यांनी केला आहे.
हिशोब मागताच जो तो गैरहजर रहायचा
सामाजिक कार्यकर्ता दिपक थोरात यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असता सुरुवातीला त्यांना माहिती देण्यास विलंब लावला. आपल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी श्री. थोरात जिल्हा रूग्णालयात गेले असता अमुक रजेवर आहे तमुक रजेवर आहे अशी उत्तरे मिळत असे. अखेर रूग्णालय प्रशासनाने जी माहिती दिली त्यात हिशोब जुळत नाही. मिळालेला निधी व खर्च दाखविलेला निधी यात जमीन आसमानचा अंतर आहे. मग हा निधी गेला तर कोठे गेला. खर्च झालेल्या निधिचा ऑडिट करण्यात आला का ? असा सवाल ही दिपक थोरात यांनी उपस्थित केला आहे.
विभागीय आयुक्तालयासमोर करणार उपोषण
आरटीआय कार्यकर्ता दिपक थोरात यांच्या मते कोरोनाकाळात कोवीड सेंटर व इतर आरोग्य सुविधेच्या उपाययोजनेसाठी तब्बल 285 कोटी रूपयापेक्षाही जास्तीचा निधी आलेला असताना एजन्सीला आरटीजीएस व चेक द्वार 80 कोटीचा निधी वितरित केल्याचे दाखविले आहे तर इतर बाकी निधी हडपण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासन, आरोग्य प्रधान, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री सह स्थानिय लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही कांहीही फरक पडलेला नाही. यासाठी दिपक थोरात आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही दिपक थोरात यांनी केली आहे.