बीड येथील 100 कोटी 60 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात प्रतिपादन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटामध्ये देखील निधीची चणचण असूनही विकासाचा गाडा थांबू दिला नाही. आरोग्य, रुग्णालय आणि विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. विकास कामांसाठी येणारा पैसा हा जनतेचा असून यामधून होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले. बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गासह विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकार पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले.
मंगळवारी बीड येथे 100 कोटी 60 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी मुंबई मंत्रालयातून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आ. विक्रम काळे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही. बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता, डीपीडीसी मधून 360 कोटी रुपयास नुकतीच मंजुरी दिली, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ व त्यास 20 कोटी भागभांडवल साठी तरतूद, वसतीग्रहासाठी निधीची तरतूद, नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा हिश्शाचा निम्मा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.
अर्थमंत्री या नात्याने जिल्ह्याला झुकते माप द्या – पालकमंत्री मुंडे
बीड जिल्हा पुण्याच्या धर्तीवर विकिसत व्हावा हे आपले स्वप्न असून, यासाठी अर्थमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला निधी देताना झुकते माप द्यावे, अशी विनंती पुढे बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी रखडलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गासह, ऊसतोड कामगारांची आर्थिक उन्नती, शेतीला मुबलक पाणी, ग्रामीण भागातील दळण वळण अशी अनेक विधायक कामे पूर्ण करण्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे असे पालकमंत्री मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कामकाज, कोविड व्यवस्थापन व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची संक्षिप्त माहिती दिली.
अमृत पेय जल योजनेचे 100 टक्के काम पूर्ण व्हावे – आ. संदीप क्षीरसागर
कार्यक्र माचे प्रास्ताविक आ. संदीप क्षीरसागर यांनी केले; बीड मधील आजच्या विकासकामांची माहिती देत त्यांनी बीड शहर व भागातील विविध मागण्या सर्व मंत्री महोदयांसमोर मांडल्या तसेच आज भूमिपूजन झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी या कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रत्यक्ष बीडला यावे अशी विनंती केली. बीड शहरात सुरू असलेलता अमृत पेय जल योजनेतून 90% काम पूर्ण झाले असून उर्विरत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासक व प्रशासनाने सहकार्य करून समन्वय साधावा असे साकडे आ. संदीप क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांना घातले. यास सकारात्मक प्रतिसाद देत अजितदादा पवार यांनी प्रशासक नामदेव टिळेकर यांना नगर परिषदेचे थकीत वीजिबल वसुली, दंड आकारणी यात सुवर्णमध्य साधून उर्विरत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
बीड येथे जिल्हा रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, मा. आ. अमरिसंह पंडित, मा. आ. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर .राजा, पंचायत समतिीच्या सभापती श्रीमती सारिका गवते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, पंचायत समतिीचे पदाधिकारी, विविध यंत्रणातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरु वातीस भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोण काय म्हणाले..,
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ : बीड पंचायत समितीचे लोकार्पण हे कोरोना काळात केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी इमारतींच्या पूर्णत्वास आवश्यकतेप्रमाणे निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे : नवीन मंजुरी दिलेल्या 200 खाटांच्या रु ग्णालयामध्ये 170 आय सी यू बेड व तीस पेडियाट्रिक आयसीयू बेड मंजूर करण्यात आले आहेत. तसेच यासाठी आवश्यक असणार्या वैद्यकीय अधिकारी नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफ च्या 125 पदांना देखील मंजुरी देण्यात येत आहे. कोरोना परिस्थितीत राज्याच्या आरोग्य विभागाने मोठे काम केले आहे.