वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वासात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.
8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं.
तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. प्रकृती पुन्हा एकदा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून होते.
लता दीदी या आयसीयूमध्ये होत्या. यावेळी डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारादरम्यान त्यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. लता दीदी रुग्णालयात दाखल झाल्यापासून संपूर्ण परिवार चिंतेत होता. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.