गेवराईत कार्यसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यातील खेळाडू राज्यात, देशात मोठ्या स्पर्धात्मक खेळात नेहमीच पुढे असतात त्यांना योग्य मार्गदर्शन आणि क्रीडा साहित्य तसेच क्रीडांगण उपलब्ध झाल्यास आणखी प्रगती करू शकतील, या खेळाडूंना जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दोन कोच उपलब्ध करून देऊ. गेवराईचे आ.लक्ष्मण पवार आणि आमचे पूर्वीपासून संबंध असून यावेळी देखील आ.पवार हॅट्रिक करून दाखवतील असा विश्वास नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती क्रिकेट क्लब आयोजित कार्यसम्राट चषकाचे गेवराई शहरात आयोजन करण्यात आले असुन, याचे उदघाटन शनिवारी नगराध्यक्ष तथा जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आ.लक्ष्मण पवार, पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी, रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, गेवराईचे नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, शिवराज पवार, सचिव क्रिकेट असो.आमेर सलिम, सभापती विनोद मुळूक, नगरसेवक गणेश वाघमारे, जे.डी.शहा, राहुल खंडागळे, सादेक भाई, राजेंद्र राक्षसभुवनकर, पत्रकार मधुकर तौर, भगवान घुंबार्डे यांच्यासह क्रिकेट प्रेमी, खेळाडू उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, गेवराईचे पवार आणि आमचे जुने कौटुंबीक संबध आहेत ते कोणत्याही पक्षात असोत गेवराईचे आमदार पवार यांच्या कामा विषयी संपुर्ण राज्यभर चर्चा आहे. त्यामुळे काम करणार्या माणसाला आमचा नेहमीच पाठींबा असतो. किक्रेटच्या खेळामध्ये जसा एखादा खेळाडु हॅट्रिक घेतो तशी हॅट्रिक गेवराईचे लोकप्रिय आ.लक्ष्मण पवार करणार असल्याचा विश्वास व्यक्त करून गेवराईच्या खेळाडुंना दोन कोच देऊ असे प्रतिपादन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी केले.