By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हयात तिसऱ्या लाटेचा जोर मंदावत असल्याचे आढळून येत आहे. शनिवारी प्राप्त रिपोर्ट रिपोर्टनुसार 115 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दूसरीकडे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण बाधितांच्या तुलने जवळपास दुप्पट आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत 1592 संशयीत रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात 115 जणांची रिपोर्ट पॉजिटीव्ह तर 1477 जणांची रिपोर्ट निगेटीव आली आहे.
जिल्ह्यात संक्रमणाचा दर दहाच्या जवळपास आहे. तर अॅक्टीव रूग्णांची संख्या ही हजाराच्या घरात आहे. मागील चार दिवसांपासुन शंभरच्या जवळपास रूग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा जोर मंदावत असल्याचे दिसते.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 10 |
आष्टी | 23 |
बीड | 19 |
धारूर | 02 |
गेवराई | 12 |
केज | 09 |
माजलगाव | 06 |
परळी | 19 |
पाटोदा | 07 |
शिरूर | 05 |
वडवणी | 03 |
एकुण रूग्ण | 115 |