मैत्रिणीचा जन्मदिवस साजरा करून परतताना घडली दुर्दैवी घटना
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून परत येतांना वाटेत विहिरीत बुडून दो सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बाग येथे घडली.

अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागातील रहिवाशी अल्ताफ शेख यांच्या दोन मुली सानिया शेख (वय 18) आणि निदा शेख (वय 16) ह्या आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोरेवाडी येथे गेल्या होत्या. दरम्यान सकाळी वडील त्यांना मैत्रिणीच्या वाढिदवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दर घटनेची माहिती समझताच पोलिस अधिकारी कर्मचारी तात्काभ घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रु ग्णालयात दाखल केले. दोन सख्ख्या बहिणींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा आत्महत्येचा प्रकार आहे की आणखी कांही या बाबत पोलिस तपास करीत आहेत.