डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधुन आणि हातात काळे झेंडे घेवन निषेध नोंदवला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या हल्ल्याचा बीड जिल्हा एमआयएमच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करत सर्व एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधुन आणि हातात काळे झेंडे घेवन खा. ओवेसी यांच्यावर हल्ल्याचा निषेध नोंदवला.

अशा भ्याड हल्ल्याना एमआयएम घाबरणार नाही, थांबणार नाही आणि मागेही हटणार नाही असे स्पष्ट करत खा. ओवेसींवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करून चौकशी करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष अॅड.शेख शफीक यांनी केली . बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमच्यावतीने आज धरणे आंदोलन करत खा. ओवेसी यांच्यावर हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ, सचिव हाजी अय्युब पठाण, पठाण शेख एजाज, शेख मतीन, अब्दुल सलाम शेठ, हाफेज अशफाक, अजहर मोमीन, वजीर शेख, शाकेर भाई, हसी भाई, मुफ्ती अब्दुल वाजेद अशरफी, साजन चौधरी, सुफीयान मनियार, सय्यद सैफअली, नेहाल भाई, जुनेद पटेल, नवीद पटेल, सोहेल आतार, सय्यद सफी, अरबाज खान, शफिक मोमीन, सोहेल शिकलगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.