By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष देशभर साजरे होत आहे. याचे औचित्य साधून सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँक शाखा सुभाष रोड बीड वतीने रथसप्तमी सोमवारी दि.7 रोजी सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
रथसप्तमी हा दिवस म्हणजे बँकेच्या इतिहासातील सोनेरी क्षण.! या दिवशी म्हणजे सन 1936 साली सांगली अर्बन बँकेची स्थापना कै. अण्णासाहेब गोडबोले यांनी सांगली येथे केली होती. या बँकेचे आता वटवृक्षामध्ये रुपांतर झाले असून महाराष्ट्रात 35 शाखेद्वारे सेवा देत आहे. सन 1984 साली या बँकेस शेड्युल्ड दर्जा प्राप्त झालेला आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व सांगली अर्बन बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रथसप्तमी सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिर व पानसुपारीचा कार्यक्रम सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँक शाखा सुभाष रोड बीड येथे दुपारी तीन ते सायं सहा या वेळेत आयोजित केला आहे.
या दोन्ही कार्यक्रमास खातेदार, हितचिंतक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगली अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, बीड शाखा सल्लागार श्री दीपक देशमुख, आनंद बार्शीकर, मदनजी दुगड, शाखा बीडचे व्यवस्थापक श्नी. अनिल परळीकर व सर्व कर्मचारी बांधव आदींनी केले आहे. रक्त दात्यांनी आपली नावे बॅकचे अधिकारी श्री संतोष देशमुख यांचेकडे 9511775568 या क्रमांकावर नोंदवावीत.