By MahaTimes ऑनलाइन – बीड |
परळी येथील दोन राजकीय गटांत तुंबळ हाणामारी घडून आली. ही घटना बुधवारी (दि.२) फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली . सदरौल घटनेत दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले असून, संभाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपार रोडवर दोन राजकीय गटांत भांडण झाली. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक देशमुख व माजी नगरसेवक कराळे यांच्यात ही भांडणे झाली. धनंजय बालासाहेब कराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख, मुकुंद दीपक देशमुख, निलेश देशमुख, गणेश देशमुख, सुनील देशमुख यांच्यावर कलम १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ३२४ , ३२३ , ५०४ , १०५ , ४२७ आदवी सुतार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गणेश दिपकराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहेशनाना कराळे, धनंजय कराव ओम कराळे यांच्यावर संभाजीनगर ठाण्यात कलम १४२ , १४७ , १४८ , १४२ , ३२४ , ३२३ , २०४ , १०५ , ४२ वी सुसार बुन्ह्याची नोंद करण्यात आली आले. पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.