आज मुकद्दर में मौत नहीं थी इसलिए जिंदा हूं- असदुद्दीन ओवेसी
By MahaTimes ऑनलाइन वृत्तसेवा | नवी दिल्ली
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दोन लोकांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला आहे. आरोपींनी चार राउंड फायर केल्या, अशी माहिती ओवेसी यांनी स्वत: ट्विटरवर दिली आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Elections 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेला जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
“काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार केला गेला. चार राउंड फायर झाल्या. ते तीन-चार लोकं होती. गोळीबार करुन सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो आहे. या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे”, ‘यूपी सरकार और चुनाव आयोग से मांग है कि इस पूरे मामले की जाचं करें’ असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.
10-14 फेब्रुवारीला मतदान पार पडणार
ओवेसींची एमआयएम पक्ष उत्तर प्रदेशात भागीदारी परिवर्तन मोर्चासोबत निवडणूक लढत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. या भागातील जिल्ह्यांमध्ये येत्या 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी आणि 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या भागामध्ये सर्वच पक्षांकडून जोर लावला जात आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना ओवेसी यांच्या ताफ्यावर अशाप्रकारे गोळीभाराची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.