पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांची उपस्थिती
अनेक सुविधा मिळणार एकाच छताखाली
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
डॉ. स्वप्नील ढाकणे व डॉ. सौ. प्रियंका ढाकणे यांच्या सर्व सोयीनियुक्त यशश्री हॉस्पिटल आणि नेत्रालय, टेस्ट ट्युब बेबी सेंटरचा शुभारंभ 29 जानेवारी रोजी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, नाशिकचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आ. राजेंद्र जगताप, बाबुसेठ जाजू, डॉ. श्रीहरी लहाने, डॉ. राजेंद्र ढाकणे, डॉ. विनिता ढाकणे, अरूणनाना डाके, अॅड. विवेकानंद सानप, डॉ. सुनील पालवे, डॉ. अमोल लहाने, डॉ. सौरभ कराड, डॉ. स्वाधीन ढाकणे, डॉ. शिवाजीराव सानप, राजेंद्र बांगर, उद्योजक भगवानराव बांगर, जयंत पत्की, गोविंदराव चौरे यांची उपस्थिती होती.

यावेळी पंकजाताई मुंडे यांनी बोलतांना सांगितले की, ढाकणे परिवारामध्ये 15 व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या हातून रूग्णांची सेवा निस्वार्थ सेवा घडत आहे. बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ. नारायणराव ढाकणे यांचे नातू डॉ. स्वप्नील ढाकणे व डॉ.सौ. प्रियंका ढाकणे यांच्या यशश्री हॉस्पिटल आणि नेत्रालय, टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या माध्यमातून रूग्णांची सेवा अविरतपणे घडणार आहे. त्यांच्या सर्व टीमला माझ्या शुभेच्छा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश ढाकणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित ढाकणे, विजय धस, कृष्णा मुंडे, वैभव टाक, मंगेश सांगळे, राम नवले, अंगद घाटे यांनी बहुमोल परिश्रम घेतले.
अनेक सुविधा मिळणार एकाच छताखाली
यशश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी, वंध्यत्व निवारण, प्रसुती गृह, सोनोग्राफी सेंटर, बिन टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, बुबूळावरील पडदा, कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी, फेको पध्दतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनीक इत्यादी सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध असणार आहेत.