By MahaTimes ऑनलाइन – बीड |
पुरोगामी पत्रकार संघाच्या पोलिस मित्र समिती जिल्हाध्यक्षपदी पत्रकार शेख तालीब अब्दुल बाशीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ, सचिव प्रविण परमार यांनी पत्रकार शेख तालीब यांना पोलिस मित्र समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले आहे.
शेख तालीब हे बीड सायं. दै . सिटीझनचे उपसंपादक आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.