By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भारताच्या प्रजासत्ताक दिनी बीडमध्ये दोन महिला कामगार चक्क लिंबाच्या झाडावर चढवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. आंदोलकाला झाडावरुन उतरवण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर स्वत: सीढी लावत झाडावर चढले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादिवशी बीडमध्ये नगर परिषदेच्या कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून नुसते आश्वासन देऊन या महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतले नाही. नगर पालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळून आज दोन महिला कामगार चक्क लिंबाच्या झाडावर चढवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. त्यांनी महिला आंदोलकांचा प्रकार पाहून स्वत: सीढी लावत झाडावर चढले. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे. झाडावर चढून आत्महत्या करणे पर्याय नाही, असे सांगून स्वतः याप्रकरणी लक्ष देईल असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी महिला कर्मचारी, कामगारांना दिला व झाडावरून खाली येण्यासाठी विनंती केली. या प्रकरणी पुढील काळात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनातून हा प्रश्न नक्कीच मार्गी लागलेला असेल हा माझा शब्द आहे असं आश्वासन त्यांनी दिले. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिल्ह्यात या प्रकाराची सगळीकडे चर्चा सुरु आहे.