By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हयात बुधवारी तीनशेच्या जवळपास रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत 2371 संशयीत रूग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यात 195 नवे रूग्ण सापडले. तर 2076 जणांची रिपोर्ट निगेटीव्ह आली.

आरोग्य विभागाने बुधवारी दुपारी जाहीर केलेल्या माहितीनुसार संशयीत रूग्ण व बाधित रूग्णांचा आकडा देखील वाढला आहे. अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत आहे. आज तालुक्यात 76 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. परलीत 52 तर माजलगाव मध्ये 43 नवे रूग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 76 |
आष्टी | 25 |
बीड | 38 |
धारूर | 03 |
गेवराई | 17 |
केज | 25 |
माजलगाव | 43 |
परळी | 52 |
पाटोदा | 01 |
शिरुर | 05 |
वडवणी | 10 |
एकुण रूग्ण | 195 |