By MahaTimes ऑनलाइन – बीड |
आरटीईच्या नियमांची अंमलबजावणी न करता वह्या, पुस्तके, लेखन साहित्याची विक्री करत शाळेतच दुकानदारी थाटणाऱ्या एका नामांकित शाळे शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले होते. पालकांची तक्रारीची गंभीर दखल घेत औरंगाबादच्या शहानूरमियाँ दर्गा परिसरातील द जैन इंटरनॅशनल शाळेविरुद्ध कारवाई करून काळ्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.
द जैन इंटरनॅशनल स्कूलने शाळेच्या आवारात पुस्तके, लेखन साहित्य विक्री केल्याची तक्रार अमित निर्मलकुमार कासलीवाल व इतर तीन पालकांनी औरंगाबाद येथील जिल्हा बालहक्क परिषद आणि शिक्षण विभागाकडे केली होती. शिक्षण विभागाने सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तक्रारकर्त्या पालकांचे विद्यार्थी इयत्ता पहिली वर्गात असल्याचे आढळून आले होते.
त्यांना शाळेत पुस्तके खरेदीसाठी 4 हजार 700 रुपये भरल्याची पावती दिली होती. दिलेली पावती व प्रत्यक्ष घेतलेली रक्कम यात 1,417 रुपये अधिक घेतल्याचे निदर्शनास आले. पावतीवर कुठल्याही प्रकारचा जीएसटी क्रमांक नमूद करण्यात आला नसल्याचे चौकशी समितीला आढळून आले होते.
त्यानुसार शिक्षण उपसंचालक विभागाने 11 जून 2004 च्या शासन निर्णयानुसार कारवाई करून द जैन इंटरनॅशनल शाळेला शिक्षण विभागाने काळया यादीत टाकले आहे. सदर शाळेवर झालेल्या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांची सर्रास लूट करणाऱ्या संस्था चालकाचे धाबे दणाणले आहे.
फार जुनी तक्रार, मला याची काहीही माहिती नाही
सदरील तक्रार वर्ष 2020 मधील आहे. मी गेली दहा महिन्यांपूर्वी रूजू झाले आहे. या संबंधात मला काहीही माहिती नाही. पालकांना कोणतीही सक्ती करण्यात येत नाही. असे शाळेच्या उप प्राचार्य शिखा श्रीवास्तव यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले.