राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम संपन्न
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी देशात निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून, तो दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. आयोगाने मतदानासाठी सगळ्या घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मतदारांनी जात धर्म वंश रंग अशा विचारांच्या प्रभावाखाली न येता व प्रलोभनांना बळी न पडता मतदाना मध्ये सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा विधी सेवा कार्यालयाचे सदस्य सचिव श्री सिद्धार्थ गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडगे बीड, तहसीलदार सुरेंद्र डोके श्री राजेंद्र लाड आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री. गोडबोले म्हणाले,मतदानाच्या माध्यमातून आपणास चांगला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी असते.

याद्वारे आपण देशाच्या विकासासाठी योगदान देत असतो. ही संधी व मतदानाचा अधिकार काही देशांमध्ये सगळ्यांना सुद्धा मिळत नाही असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी केले तर सूत्रसंचालन निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार अनिल विद्यागर यांनी केले.

यावेळी बीड जिल्ह्यातील विवाह विविध ठिकाणावरून आलेले मतदान अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापैकी काही जणांचा प्रतिकात्मक सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. उपविभागीय अधिकारी शरद झाडगे अंबाजोगाई, तहसिलदार सुरेंद्र डोके बीड, सचिन देशपांडे, विजय धावने, राजेंद्र लाड, सचिन गायकवाड, योगेश काळबांडे, विश्वजित लांडगे, रवी पांगर, दिपक घाडगे, प्रकाश सुतार, उषा ढेरे, सी.पी. थोरात, श्री. सुरवसे, श्रीमती जाधव, रेखा धांगडे, अमोल कणसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला ‘राष्ट्रीय मतदार दिना’ निमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली.