By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राष्ट्रीय बालिका दिवसाचे औचित्य साधुन सोमवारी (दि. 24) सुकन्या समृद्धी योजनेच्या विशेष अभियानाचा शुभारंभ देवी बाभुळगाव शाखा डाकघर अंतर्गत पूर्व उपविभाग बीड येथून करण्यात आला. यावेळी आयोजित सुकन्या समृद्धी मेळाव्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 200 मुलींचे बचत खाते उघडण्यात आले.
या प्रसंगी डाक अधीक्षक एस.एम. अली, निरीक्षक पूर्व उप विभाग पी.ए. महाजन, एनसीपी चे नेते तथा समाजसेवक डॉ. बाबुराव जोगदंड सहित देवी बाभुळगाव के सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सदरील कार्यक्र माचे प्रायोजकत्व डॉ. बाबुराव जोगदंड यांनी घेतले होते. त्यांनी 200 सुकन्या समृद्धी खात्यांसाठी फंडस् देऊन 100 टक्के सुकन्या ग्राम/ मंडळ करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. यावेळी 10 वर्षातील आतील 200 मुलींचे सुकन्या समृद्धी खाते राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने उघडण्यात आले.
बालिकेच्या उज्वल भविष्यासाठी लाभदायि योजना
भारतीय डाक विभाग बीड यांच्या वतीने बालिका दिनानिमित्त 17 ते 31 जानेवारी पर्यंतच्या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये वय वर्ष 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींचे फक्त रु .250 चे खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बालिकेच्या उज्वल भविष्यासाठी जास्ती जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी बीड डाकघर विभागाचे अधीक्षक एस. एम. अली यांनी केले आहे.