1165 रूग्णांची कोरोना तपासणीत 988 निगेटिव्ह
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून तीनशेच्या जवळपास कोरोना बाधित रूग्ण आढळून येत होते. सोमवारचा दिवस जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरला. संशयीत व बाधित रुग्णांची संख्या ही निम्म्यावर आली. 1165 रूग्णांची कोरोना तपासणी केली त्यात 177 नवे रूग्ण सापडले.

आरोग्य विभागने सोमवारी दुपारी जाहीर केलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत 1165 संशयीत रुग्णांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली. यात तब्बल 177 नव्या बाधितांची ओळख झाली. तर 988 जणांची रिपोर्ट निगेटीव आल्याने त्यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
बीड तालुक्यात सर्वाधिक 47 तर अंबाजोगाई तालुक्यात 44 कोरोना बाधित आढळून आले आहे. शहर व ग्रामीण क्षेत्रात रूग्णांची संख्या अचानक वाढल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
अंबाजोगाई | 44 |
आष्टी | 05 |
बीड | 47 |
धारूर | 07 |
गेवराई | 08 |
केज | 22 |
माजलगाव | 10 |
परळी | 11 |
पाटोदा | 05 |
शिरुर | 04 |
वडवणी | 14 |
एकुण रूग्ण | 177 |