अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, आ.संदिप क्षीरसागर यांचे नागरिकांकडून आभार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अनेक वर्षापासून रखडलेल्या बिंदूसरा नदीवरील बंधाराकम पुलाचा प्रश्न आ.संदिपक्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सुटला आहे. या पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असल्याने आ.संदिप भैय्यांनी दिलेला शब्द पाळल्याने शहरातील नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
सोमवारी या पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह पदाधिकारी गेल्यानंतर आ.संदिप भैय्यांना उपस्थितांनी अक्षरश: खांद्यावर घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जयघोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या व अधिकार्यांच्या हस्ते सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
बिंदूसरा नदीवर बंधारा करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जलसंपदा तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या बंधार्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून मंजुरी आणली. आता या पुलाच्या सर्वेक्षण कामास जलसंपदा अधिकार्यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली आहे.
पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहिल -आ.संदिप क्षीरसागर
बिंदूसरा नदी पात्रातील बंधार्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे, जसलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. सदर काम पुर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू राहिल असा शब्द देतो असे सांगत कोणाला काय टिका करायची ती करू द्या आपण विकास कामे करत राहू असा टोलाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी विरोधकांना लगावला आहे.