By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील प्रजासत्ताक दिवस व अल खैर मल्टीपर्पज फाऊंडेशन बीडच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने 26 जानेवारी रोजी बीड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

26 जानेवारी सकाळी 10 ते 5 या वेळेत तकिया मस्जिद नर्सरी रोड येथे रक्तदान शिबीर पार पडणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. रक्तदान हे एक राष्ट्रीय कार्य आहे. या शिबीरात जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा. व माणुसकीचे दर्शन घडवावे. असे आवाहन अल खैर मल्टीपर्पज फाऊंडेशन चे अध्यक्ष अझहर इनामदार यांनी केले आहे.