By MahaTimes ऑनलाइन – औरंगाबाद |
शहरातील प्रसिध्द सहारा ग्रुप च्या वतीने दरवर्षांप्रमाणे या ही वर्षीय भव्य प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 23 जानेवारी रोजी आयोजित शिबिरात 502 जणांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
स्थानीय प्रसिध्द सहारा ग्रुप ही अराजकीय संगठना गेल्या आठ वर्षांपासून शासकीय रु ग्णालयात (घाटीत) संपूर्ण मराठवाड्यातून उपचारासाठी येणार्या गोर गरीब, वंचित, गरजू आणि निराधार रूणांच्या सेवेत अग्रेसर आहे. सहारा ग्रुप तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या वर्षी जिल्ला हॉस्पीटल परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात शहरातील 502 नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान शिबिरात भाग घेतला. विशेषत: तरु णांनी आपले रक्तदान करून अनेकांना जिवदान दिले.
या शिबिरात सकाळपासून सायंकाळपर्यंत तरु णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान शहरातील अनेक मान्यवरांनी शिबिरस्थळी भेट देऊन तरु णांचा उत्साह वाढवला. शिबिरासीठी जिल्ला हॉस्पीटलच्या डॉ. मंजू जिल्ला व डॉ. परसी जिल्ला यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे सहारा ग्रुपच्या वतीने आभार मानले.
हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहारा ग्रुप चे ताहेर पटेल, मुंशी भैय्या पटेल, ज़मीर बाँड, इद्रीस नवाब, शारेक काज़ी, हाफिज़ ज़ुबैर, उमैर पटेल, अशफाक सिद्दीकी, माजेद पटेल, आमेर खान, फैसल मिर्ज़ा, पठान मोहसिन खान, अब्दुल अज़ीम, शेख इमरान, शेख मुकीम आदिंनी परिश्रम घेतले.