वैद्यनाथ कॉलेजमधील गैरकारभाराची चौकशी होणारच
चौकशी समिती स्थगित करण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार;
चौकशीचा अहवाल आल्यानंतरच उच्च न्यायालय अंतिम निकाल देणार
By MahaTimes ऑनलाइन – बीड/औरंगाबाद |
परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील गैर कारभाराची चौकशी होणारच असून, महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यास उच्च न्यायालयाने मनाई आदेश पारित केल्याचे वृत्त चुकीचे आहे, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ एड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.
संस्थेने विद्यापीठाच्या वतीने नेमलेल्या चौकशी समतिीला स्थिगत करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती, ती मागणी बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नाकारली असून, महाविद्यालयाची चौकशी होणारच आहे.

वैद्यनाथ महाविद्यालयात असलेला वाद व गैरकारभार उघड आहे, त्यावरून काहीजण जाणीवपूर्वक पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करून व बदनामी साधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेवर बुधवारी (दि. 19) सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सदर महाविद्यालयाच्या चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितिचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम सुनावणी घेतली जाईल, असे स्वयंस्पष्ट आदेश दिले असल्याने व चौकशी समिती स्थिगत करण्याची मागणी फेटाळल्याने संस्थेने माध्यमांमध्ये कांगावा सुरू केला आहे.
दरम्यान विद्यापीठाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समतिीचा अहवाल संस्थेत सुरू असलेल्या अनागोंदीला उघड करणार असून, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व काही उघड होईल, अशी माहिती एड. ठोंबरे यांनी दिली आहे.
संस्थेने जनतेची दिशाभूल थांबवावी
दरम्यान उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विभागातील वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठ प्रशासन व चौकशी समतिी या सगळ्यांवरच संस्थेने आक्षेप घेणे मग या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करावी का? असा हास्यास्पद सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात असून, न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाचा अर्थ समजून घेऊन संस्थेने जनतेची दिशाभूल थांबवावी असे आवाहन करण्यात आले आहे.