बडगे यांची दुसर्यांदा तर पाठक यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी विलास बडगे तर उपाध्यक्षपदी मनोजकुमार पाठक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बडगे यांची दुसर्यांदा तर पाठक यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड झाली.

बीड तालुका दूध व्यवसायिक सहकारी संस्था व संघ मर्यादित बीडच्या स्थापनेपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक अविरोध होत असून दि.7 जानेवारी रोजी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून बुधवार दि.19 जानेवारी रोजी बीड तालुका दूध व्यवसायिक सहकारी संस्था संघ मर्यादित बीडच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचीत संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली. यात अध्यक्ष पदासाठी विलास बडगे तर उपाध्यक्ष पदासाठी मनोजकुमार पाठक यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डी.एम.गौंडर यांनी अध्यक्षपदी विलास बडगे तर उपाध्यक्षपदी मनोजकुमार पाठक यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकार्याला निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी धुमाळ ए.डी. यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे माजी मंत्री क्षीरसागर यांनी केले स्वागत
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे, संचालक अरूण डाके, सखाराम मस्के, प्रा.जगदीश काळे, नानासाहेब काकडे, बीड तालुका दूध संघाचे कार्यकारी संचालक संतोष श्रीखंडे, संचालक सर्व श्री जगन्नाथ मोरे, कल्याण खांडे, सर्जेराव खटाणे, राजेंद्र शेळके, महेश शिंगण, बळीराम महाराज कुटे, शेषनारायण कोळेकर, शेख मुनीर, श्रीमती तारामती दशरथ राऊत, उषा विष्णू जाधव, पंचफुला भागवत घोडके आदि उपस्थित होते.