विना परवानगी किर्तनाचे आयोजन, एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांविरूध्द गुन्हा दाखल
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता निर्बंध लागू असतांना विना परवानगी कीर्तन कार्यक्रम घेतल्याने मनसे चे जिलाध्यक्ष सुमंत धस यांच्या विरूध्द केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र कार्यक्रमाची सुपारी घेणारे कीर्तनकार पोलिसांच्या नजरेतून सुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केज तालुक्यातील नांदुरघाट येथे सोमवारी (दि. 17) कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री. धस यांनी 16 जानेवारी रोजी पोलिस प्रशासनास परवानगी मागीतली होती. मात्र जिल्ह्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर जमावबंदी व संचार बंदी लागू असल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांना कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारत नोटीसीद्वारे कळविले होते.
मात्र नियोजित कार्यक्रम असल्याने ठरलेल्या दिवशी व वेळेत पार पडला. या कार्यक्रमास हजार-बाराशे लोकांचा जमाव जमला होता. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याने जमावबंदी आदेश डावलल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले.
पोलिस जमादार मेसे यांनी रितसर फिर्याद देत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 10/2022 भा.दं.वि. 188, 269, 270, 17 51(ब) गुन्हा नोंद केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मेसे हे पुढील तपास करीत आहेत.
धार्मिक कार्यक्रमावरच गुन्हा नोंद का?
एकीकडे राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या सभा होत असताना धार्मिक कार्यक्रमावरच गुन्हा नोंद का? माझ्यावर गुन्हा
नोंद करण्यासाठी प्रशासनाने जेवढी तत्परता दाखवली तेवढी तत्परता इतर राजकीय नेत्यांबाबत दाखवणार का? संत भगवानबाबा यांचे विचार समाजात पसरवणे गुन्हा असेल तर असे अनेक गुन्हे माझ्यावर नोंद झाले तरी हरकत नाही.
सुमंत धस,
जिलाध्यक्ष, मनसे